रत्नागिरी शहराला शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा
रत्नागिरी शहराला शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसे नियोजन करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
या धरणात 5 ते 6 जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहराला पानवल धरण, शिळ धरण, नाचणे तलाव आणि एमआयडीसी धरणातून पाणी मिळते. परंतु, नवीन नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर एमआयडीसीकडून घेण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. नाचणे तलाव आणि पानवल धरणातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार शिळ धरणावर आला आहे.
तापमान वाढल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने पाणी पातळी कमी होत गेली आहे. पुढेही हीच स्थिती असल्याने दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
शहराच्या वरच्या भागात शनिवारी पाणी पुरवठा होणार आहे. यामध्ये सन्मित्रनगर, आंबेशेत, लांबेचाळ, माळनाका, मारूतीमंदिर, थिबापॅलेस रोड, आनंदनगर, विश्वनगर, नूतननगर, छत्रपती नगर, सहकार नगर, एस. व्ही. रोड, हिंदू कॉलनी, विष्णूनगर, नवलाई नगर,अभ्युदयनगर, उद्यमनगर, नरहर वसाहत, शिवाजीनगर, साळवीस्टॉप, रमेशनगर, चाररस्ता मजागांव रोड, स्टेट बँक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी, एकता मार्ग, राजापूरकर कॉलनी, कोकणनगर (जुने), कोकणनगर (फेज नं. 4), कीर्तीनगर या भागात पाणी पुरवठा होणार आहे. उर्वरित खालच्या भागात रविवारी पाणी पुरवठा होणार आहे. यामध्ये राजिवडा, निवखोल, शिवखोल, गवळीवाडा, बेलबाग, चवंडेवठार, घुडेवठार, खडपेवठार, मांडवी, रामआळी, मारूतीआळी, गोखलेनाका, राधाकृष्ण नाका, झारणी रोड, जेल रोड परिसर, धनजी नाका, आठवडा बाजार, झाडगाव, टिळक आळी, शेरेनाका, तेलीआळी, जोशी पाळंद, वरची आळी, खालची आळी, लघुउद्योग, मुरूगवाडा, मिरकरवाडा, राजवाडी, 80 फुटी हायवे परिसर, पेठकिल्ला, मांडवी, वरचा फगरवठार, राहुल कॉलनी, तांबट आळी, भुवड आळी, आंबेकरवाडी, कुंभारवाडा, फातिमा नगर, आझाद नगर, पोलीस लाईन या भागांचा समावेश आहे.