रत्नागिरी शहरात सहा कोटी किमतीच्या व्हेल माशाच्या उलटची तस्करी करणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यात
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीचा तस्करी करणार्या दोन जणांना रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगर भागात असलेल्या चंपक मैदानाजवळ पोलिसांनी ताब्यात घेऊन जवळपास सहा कोटी किमतीची व्हेल माशाचे उलटी जप्त करण्यात आली आहे याप्रकरणी रत्नागिरी शहरातील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगर भागात असलेल्या चंपक मैदानाजवळ दोघेजण व्हेल माशाच्या उलटी ची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यामुळे त्यानी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला होता सोमवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकीवरून दोघे जण घटनास्थळी आले ते कोणाची तरी वाट पाहत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी सुरू केली असता त्यांच्या स्कूटरच्या डिकीत सुमारे सहा किलो वजनाची व्हेल माशाच्या उलटीचे तुकडे मिळून आले आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजे सहा कोटी किंमत आहे याप्रकरणी पोलिसांनी महम्मद जहीर सय्यद अत्तार व हबीब सोलकर या दोन दोन संशयितांना अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टेमकर करीत आहेत
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत व्हेल माशाच्या उलटची तस्करी करण्याचे अनेक प्रकार पोलिसांनी हाणून पाडले हाेते
www.konkantoday.com