
चिपळूण खेंडमध्ये ट्रकने तोडली विजेची सर्व्हिस वायर; इमारतीमधील पिण्याचे पाणी गेले वाहून, पोलिसांत तक्रार
चिपळूण : शहरातील खेंड कांगणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व्हिस वायरमध्ये ट्रक अडकून नुकसान झाले. या अपघातानंतर परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला.
ट्रक क्रमांक MHO4, FJ 8909 या ट्रक चालकाविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. सर्व्हिस वायर ओढत नेल्यामुळे लक्ष्मी वैभव अपार्टमेंटमधील वायरचे नुकसान झाले. पाण्याचे पाईप तुटून पडले. एका इमारतीच्या टाकीमधील सर्व पाणी वाहून गेले. सिल्वर पॅलेस इमारत, हरी दर्शन इमारत, बावशेवाडी येथील घरांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. याठिकाणी घडलेल्या प्रकारानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.