
दि. 3 सप्टेंबर रोजी ज्युनिअर जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा
१९ वर्षे वयोगटातील राज्य ज्युनिअर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली सन २०२५-२६ चे आयोजन महाराष्ट्र फेन्सींग असोसिएशनने भंडारा येथे दि.२६ ते २८ सप्टेंबर, २०२५ या काळात केले आहे.
जन्मतारीख ०१/०१/२००६ नंतर जन्मलेले मुले व मुली सहभागी होण्यासाठी पात्र आहेत सदर स्पर्धा फॉइल, ईप्पी व सेबर या 3 प्रकारात घेण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा फेन्सींग असोसिएशनने दि. ०३ सप्टेंबर, २०२५ रोजी रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे.
सदर स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, खुलं नाट्यगृहाशेजारी, मारुतीमंदीर, रत्नागिरी जि. रत्नागिरी येथे संध्याकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. हा खेळ प्रकार व ही राज्यस्तरीय स्पर्धा १० वी व १२वी साठी १० गूण मिळण्यासाठी पात्र आहे.
तरी खेळाडूंनी क्रीडा प्रकाराचे साहित्य व वयाच्या मूळ दाखल्यासह उपस्थित राहावे. सदर निवड चाचणी मधून रत्नागिरी जिल्हा संघाची निवड केली जाईल. कमीत कमी ४ खेळाडूंचा सहभाग असेल तर गटातील प्रथम ३ क्रमांकांना मेडल दिली जातील.
तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा असोसिएशनच्या सचिवा श्रीम. समिधा संजय झोरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : मार्तंड झोरे ९३७०२१५५२२, ९८८१२२७६९९.