रत्नागिरी राम आळीतील कॉर्नर स्टाईल दुकान चोरट्यांनी फोडले, रकमेसह कपडेही लांबवले
रत्नागिरी : येथील राम आळी येथील कॉर्नर स्टाईल हे कपड्यांचे दुकान शनिवार रात्री अज्ञाताने फोडले.
चोरट्याने रोख रक्कम आणि कपडे असा एकूण सुमारे 3 लाख 19 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना शनिवार दि. 14 मे रोजी रात्री घडली आहे. याबाबत दुकान मालक कमलेश भवरलाल गुंदेचा (वय 41, रा.पर्याची आळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुकानातील रोख 25 हजार रुपये, चांदीची नाणी आणि नामांकित कंपन्याचे कपडे चोरून नेले. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.