
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलचे वर्चस्व
रत्नागिरी : जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अरुअप्पा तथा नृसिंह पॅनेलने विरोधी संस्था पॅनेलचा पराभव केला. रमेश कीर, सीए श्रीकांत वैद्य यांच्या संस्था पॅनेलला एकाही जागेवर यश मिळवता आले नाही. 37 जागांवर अरुअप्पा पॅनलचे उमेदवार विजयी झाले. अध्यक्ष, कार्यवाह, नियामक मंडळ सदस्य, विश्वस्त व सल्लागार यासाठी ही निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मकरंद साखळकर यांनी काम पाहिले. या कामासाठी 60 कर्मचारी, प्राध्यापक नियुक्त करण्यात आले होते.
रविवारी 1072 पैकी 673 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी मतमोजणी झाली. अध्यक्षांच्या निवडीत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (455) यांनी संस्था पॅनेलच्या सीए श्रीकांत वैद्य (217) यांचा पराभव केला. कार्यवाह पदासाठी झालेल्या निवडणुकीत सतीश शेवडे (382) यांनी माधव पालकर यांचा पराभव केला.
उपाध्यक्ष पदाच्या तीन जागांवर अॅड. विलास पाटणे (500), डॉ. मुकुंद जोशी (488), अॅड. प्रदीप नेने (464) यांनी विजय मिळवला. तर विश्वस्त मंडळाच्या 3 जागांवर रवींद्र सुर्वे (450), लिलाधर जोशी (438), विवेक भावे (350) यांनी विजय मिळवला.
सल्लागार मंडळाच्या 10 जागांवर डॉ. श्रीराम केळकर (537), सीए वरदराज पंडित (515), डॉ. सुजय लेले (513), निनाद जोशी (507), दत्तात्रय शिंदे (501), भारत फडके (501), अनघा चितळे (491), उमेश आपटे (479), संतोष गुरव (460) आणि स्वप्नील सावंत (453) यांनी विजय मिळवला.
नियामक मंडळाच्या 18 जागांवरती अॅड. प्राची जोशी (498), डॉ. चंद्रशेखर केळकर (472), मंदार गाडगीळ (465), राजेंद्र मलुष्टे (464), मनोज पाटणकर (448), डॉ. संजय केतकर (446), डॉ. कल्पना मेहता (443), हेमंत देसाई (438), सचिन वहाळकर (435), अॅड. विजय साखळकर (420), अॅड. अशोक कदम (418), सुहास पटवर्धन (416), शिल्पा पटवर्धन (414), आनंद देसाई (399), सीए उमेश लोवलेकर (391), अॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये (391), भरत ओसवाल (385) आणि महेश नवेले (359) यांनी विजय मिळवला. सहकार्यवाह पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रा. श्रीकांत दुदगीकर (488) यांनी नरेंद्र पाटील यांचा पराभव केला.