देवरूख सोसायटीवर महाविकास आघाडीचाच झेंडा; भाजप, मनसे अपयशी
देवरूख : देवरूख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी ठरले. या निवडणुकीत भाजप, मनसेचा पराभव झाला असून सर्वच्या सर्व जागी महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार, भाजप – मनसे पुरस्कृत श्री देवी सोळजाई परिवर्तन पॅनेल आणि तिसरे शेतकरी विकास पॅनेल रिंगणात होते. रविवारी दिवसभर मतदान झाले तर रात्री मतमोजणी झाली. मध्यरात्री २ वाजता निकाल जाहीर झाला. यात सर्व १३ पैकी १३ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : हनिफ हरचिरकर, संतोष लाड, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, मुन्ना थरवळ, सुबोध पेडणेकर, पप्पू नाखरेकर, राजेंद्र गुरव, रवींद्र जागुष्टे, सुनील सावंत, सुजाता कांगणे, प्रियांका जागुष्टे, राजेंद्र पंदेरे.