
समुद्राच्या पाण्याचा उपयोग शोभिवंत मत्स्य शेतीकरिता केल्यास रोजगारात वाढ : डॉ. भावे
समुद्राच्या पाण्याचा उपयोग शोभिवंत मत्स्य शेती करिता केल्यास, उत्पन्न आणि रोजगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकेल, असे प्रतिपादन डॉ. संजय भावे यांनी केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण-महोत्सवी वर्षानिमित्त आर्योजित सुवर्ण-पालवी कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात शनिवारी शोभिवंत मत्स्यशेती या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचे उद्घाटक म्हणून बोलताना विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी मार्गदर्शन केले.
परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. शेखर कोवळे, माजी सहयोगी अधिष्ठाता, तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. प्रकाश शिनगारे, आजी सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय यांनी काम पाहिले. परिसंवादात मत्स्य विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी ‘शोभिवंत मत्स्य शेती: सद्यस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. मुळदे, ता वेंगुर्ला येथील शोभिवंत मत्स्य संवर्धन संशोधन केदांचे प्रमुख डॉ नितीन सावंत यांनी ‘शोभिवंत मत्स्य शेती व्यवसायातील स्वयंरोजगार आणि उद्योगाच्या संधी’ या विषयी मार्गदर्शन केले.
हर्णै येथील प्रगतीशील शोभिवंत मत्स्य शेतकरी फहाद जमादार यांनी उपस्थित शेतकर्यांना पूर्ण काचेच्या अॅक्वारियमची बांधणी आणि मांडणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ संदेश पाटील यांनी शोभिवंत मत्स्य शेतीकरिता प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ कसा घ्यावा यावर मार्गदर्शन केले. परिसंवादाला 65 शेतकरी उपस्थित होते.
परिसंवादाचे वृत्त संकलक म्हणून डॉ. सुहास वासावे आणि डॉ. भरत यादव, सहयोगी प्राध्यापक, विस्तार शिक्षण विभा यांनी काम पहिले. सूत्र संचालन भालचंद्र नाईक, सहाय्यक प्राध्यापक, मत्स्य विस्तार शिक्षण विभाग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता वैभव येवले आणि माधव गित्ते यांनी काम
केले.