खेड-खोपी मार्गावर तिसंगीनजीक इको कार पेटली

खेड : खेडहून तिसंगी गावाकडे जाणाऱ्या मारुती इको कारने पेट घेतला. यामध्ये कार जळून खाक झाली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. १५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ( एमएच०४, एफए ०४९२) ही कार घेऊन शैलेश जाधव जात होता. कारने अचानक पेट घेतल्यानंतर प्रसंगावधान राखून चालक बाहेर पडला. सीएनजी टाकीतून गळती झाल्याने आगीची तीव्रता वाढली. खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button