
रत्नागिरीत कोकण वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ
रत्नागिरी : शहरातील विवेक हॉटेलच्या मैदानावर कोकण वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. रविवारी या प्रदर्शनाचा समारोप आहे. फ्लॅट घेण्यास इच्छूक असणार्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रेडाई रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात ब्लॉक बुक करणार्या व्यक्तीला स्टॅम्प ड्युटीत तीन टक्के सवलत आणि एसबीआयचे कर्ज घेतल्यास प्रोसेसिंग फी माफ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अनेक सवलतीही मिळणार आहेत.
या प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी उद्योजक किरण सामंत, उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी, क्रेडाईचे अध्यक्ष नित्यानंद भुते, दीपक साळवी, महेश गुंदेचा, सुमीत ओसवाल व बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
रत्नागिरी जिल्हा व शहरातील महत्वाच्या गृह प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येणार आहे.