
कोल्हापूर शहरातील कळंबा मनोरम कॉलनीतील सुनेपाठोपाठ सासर्याचाही मृत्यू
कोल्हापूर शहरातील कळंबा मनोरमा कॉलनीत झालेल्या भीषण गॅस स्फोट प्रकरणात सुनेपाठोपाठ सासर्यांचाही मृत्यू झाला. अनंत भोजणे (६०), असे त्यांचे नाव आहे. पाच दिवसांपासून सीपीआरमध्ये ते मृत्यूशी झुंज देत होते. शनिवारी सकाळी त्यांनी प्राण सोडले. या आधी सोमवारीच त्यांची सून शीतल भोजणे (२९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रज्वल भोजणे (वय साडेपाच) व इशिका भोजणे (३) हे दोन्ही चिमुकले अजूनही सीपीआर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरानी सांगितले.
दरम्यान, या स्फोटप्रकरणाची चौकशी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. गॅस कनेक्शनचे काम करणार्या ठेकेदार आणि कर्मचार्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. यात बारा जणांची चौकशी झाली. अर्घाप फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडून अंतिम अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, भूमिगत गॅस वाहिनी जोडण्याच्या प्रक्रियेत झालेल्या गळतीमुळे हा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
www.konkantoday.com




