
होतकरू आणि गुणवंत कलाकारांना नवीन दालन : स्प्लॅश आर्ट्स अकॅडमी द्वारे पखवाज प्रशिक्षण वर्गाचे शानदार उद्घाटन
जैतापूर दशक्रोशीतील बालकलाकारांना व विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण उपलब्ध करून देणारी प्रथित यश संस्था म्हणजेच स्प्लॅश आर्ट अकॅडमी. या संस्थेमार्फत रविवार दिनांक २९-१०-२०२३ रोजी पखवाज क्लासेसचे उद्घाटन श्री राकेश सुभाष दांडेकर यांचे निवासस्थानी मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाले.
गेली आठ वर्षे ग्रामीण भागातील होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना विविध कलांचे प्रशिक्षण स्प्लॅश आर्ट्स अकॅडमीच्या द्वारे दिले जाते. नृत्य वादन गायन आणि क्रीडा प्रकारांमध्ये अत्यंत नावाजलेले तज्ञ प्रशिक्षक आणून येथील ग्रामीण भागातील स्थानिक विद्यार्थ्यांना अत्यल्प प्रशिक्षण फी मध्ये मार्गदर्शन केले जाते. या स्प्लॅश आर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये मोठा नावलौकिक कमावलेला आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर तालुक्यातील अत्यंत नावाजलेले पखवाज वादक, प्रशिक्षक व मार्गदर्शक श्री तन्मय परब यांच्या मार्गदर्शनाखाली पखवाज शास्त्रोक्त वादनाचे क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन श्री राकेश सुभाष दांडेकर मधील वाडा जैतापूर यांचे निवासस्थानी करण्यात आले. यावेळी या उद्घाटन सोहळ्याला परिसरातील अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या क्लासेस साठी प्रवेश मर्यादित विद्यार्थ्यांनाच दिला जाणार आहे. दर रविवारी गुरु तन्मय परब मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. आपल्या पाल्याचे नाव नोंदणी करून या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन स्प्लॅश आर्ट्स अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहे.
www.konkantoday.com