शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला प्रकरणी जिल्ह्यातील 4 एसटी कामगारांवर होणार कारवाई
रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर हल्लाबोल केला होता. या आंदोलनातील सर्वच कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 4 कर्मचार्यांचा समावेश होता.
यानंतर 22 एप्रिलपर्यंत हजर होण्याची मुदत होती. या कालावधीत हे चारही कर्मचारी हजर झालेले नाहीत. आता या कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली. मात्र, नेमकी कोणती कायदेशीर कारवाई महामंडळाकडून होणार याबाबत अद्यापही स्पष्ट झाले नाही.