गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघांना वाचवले

रत्नागिरी: गणपतीपुळे येथील समुद्रात बुडणाऱ्या कोल्हापूर येथील तिघांना गणपतीपुळे येथील मोरया वाॅटर स्पोर्ट्सच्या सदस्यांनी वाचवले. शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. सुमारास ही घटना घडली. विकास जाधव (वय-46), संजना जाधव (वय-40), अंचल करंजे (वय-21) सर्व राहणार इचलकरंजी, ता.हातकणंगले जि. कोल्हापूर अशी तिघांची नावे आहेत. हे तिघेही देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करताना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने लाटेसोबत खोल पाण्यात ओढले गेले. पाण्यात बुडत असताना समुद्र किनारी असणाऱ्या मोरया वाॅटर स्पोर्ट्सच्या सदस्यांनी स्पीड बोटच्या मदतीने सुखरूप पाण्यातून बाहेर काढून समुद्र किनारी घेऊन आले.
सध्या सर्वजण सुखरूप असून त्यांनी मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांचे आभार मानले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार मधुकर सलगर यांनी गणपतीपुळे समुद्र किनारी जाऊन बुडणाऱ्या पर्यटकांची चौकशी करून त्यांना मदतीचे सहकार्य केले. गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनीही मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button