
बोटीच्या कडेवर बसलेल्या खलाशाचा दारूच्या नशेत तोल जाऊन खाडीत पडून मृत्यू.
बोटीच्या कडेवर बसलेल्या खलाशाचा दारूच्या नशेत तोल जाऊन खाडीत पडून मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे गुरुवारी घडली असून, शनिवारी त्याचा मृतदेह सापडला.शिवदयाल मनशाराम रायदास (२६, रा.कच्छिनखेडा सुसुमऊ, उन्नव, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.जयगड येथील खाडीत शिवदयाल रायदास हा गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान दारू पिऊन बाेटीच्या कडेवर बसला हाेता. काही वेळाने त्याचा ताेल गेला आणि ताे खाडीत पडला. त्यानंतर, त्याचा सर्वत्र शाेध घेण्यात आला. मात्र, त्याचा कुठेच शाेध लागला नाही.दरम्यान, शनिवारी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान जयगड साखर माेहल्ला येथे खाडीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत पाण्यावर तरंगताना एक मृतदेह दिसला. या मृतदेहाची खात्री केली असता, ताे शिवदयाल रायदास याचा असल्याची खात्री झाली.