
सोमेश्वर येथे फणसाच्या झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी : सोमेश्वर मडकेवाडी येथे तरुणाने फणसाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. 11 मे रोजी रात्री 9 वा. च्या सुमारास उघडकीस आली.
रुपेश गोविंद मडके (वय 35, रा. सोमेश्वर मडकेवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
बुधवारी रात्री रुपेश मडके याच्या पत्नीने दुर्गेश मडकेला फोन करुन रुपेश मडके फणसाच्या झाडावरून घरी आले नसल्याचे सांगितले. तेव्हा दुर्गेशने जाऊन पाहिले असता त्याला रुपेश गावडे फणसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पुतण्या दुर्गेश नीलेश मडके (वय 19, रा. मडकेवाडी, रत्नागिरी) याने पोलिसांना खबर दिली. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.