
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे येथे अपघात
साखरपा : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर दाभोळे बाजारपेठेत ट्रक व टेम्पो यांचा भीषण अपघात झाला.
या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे.
लक्ष्मण विठ्ठल जाधव (रा. औरंगाबाद ) असे टेम्पो चालकाचे नाव आहे. अपघातानंतर टेम्पो चालक वाहनात अडकून पडला होता. स्थानिकांनी यात अडकलेल्या चालकाला बाहेर
काढले व 108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी तत्काळ हलविण्यात आले. यावेळी डॉ. तेजश्री अनुसे, सहायक महेश रेडीज यांनी अपघात ठिकाणी धाव घेत प्राथमिक उपचार केले.