
दापोलीत राज्यपालांच्या दौर्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क
दापोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दापोलीत येणार आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठात दि. 13 रोजी त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही बाधा येऊ नये म्हणून दापोली पोलिस यंत्रणा अॅलर्ट झाली आहे. दौर्याआधीच ठीकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. दापोली तालुका हा पर्यटन तालुका असल्याने दापोलीत पर्यटकांची वर्दळ देखील अधिक आहे. मे महिना असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात दापोलीत दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिस सतर्क राहून वाहनांची तपासणी करत आहेत.