५२ खातेदारांचे पंचवीस लाख रुपये स्वत च्या फायद्यासाठीवापरले,चरवेली येथील पोस्ट कर्मचारी सचिन पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील चरवेली गावातील पोस्टातील खातेदारानी पोस्टात जमा करण्यासाठी दिलेली पंचवीस लाखांची रक्कम स्वत च्या फायद्यासाठी वापरून रकमेचा अपहार केल्याच्या आरोपावरून चरवेली येथील ग्रामीण डाक सेवक सचिन शशिकांत पवार याच्याविरूध्द ग्रामीण पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातील आरोपी हा २०१०पासून २०२२ या कालावधीत ग्रामीण डाकसेवक शाखा , चरवेली येथे सरकारी नोकरीत नेमणुकीवर असताना त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून चरवेली गावातील व चरवेली परिसरातील बावन्न खातेदारांची एकूण २५लाख तेरा हजार रुपयांची रक्कम खातेदारांकडून स्वीकारून ते खातेदारांच्या पोस्ट खात्यामध्ये जमा न करता तसेच काही खातेदारांच्या अपरोक्ष त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून या रकमेचा स्वत च्या फायद्यासाठी वापर करून अपहार करून खातेदार व डाग विभागाची फसवणूक केली म्हणून त्याच्याविरोधात ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com