
*धरणामुळे कृषी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार*_______
*खेड”:- खेड तालुक्यातील आंबवली येथे ४३ कोटी ९८ लाख ५३ हजार १४८ रूपये खर्चून उभारण्यात येणार्या लघुपाटबंधारेच्या धरण प्रकल्पामुळे ८ ते १० गावातील कृषी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निघेल. या प्रकल्पाद्वारे २०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन ओलिताखाली सुजलाम सुफलाम बनेल, असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला.आंबवली येथे कोट्यावधी रूपये खर्चून उभारण्यात येणार्या धरण प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, आंबवली विभागातील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.www.konkantoday.com




