
पोलीस असल्याची बतावणी करत दागिने लुटले ,रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर भागात वृद्धेचे सत्तर हजारांचे दागिने लांबविले ,आणखी एक प्रकार
पोलीस असल्याची बतावणी करत दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरात एका वृद्ध महिलेचे दिड लाख रुपयांचे दागिने लांबविण्याचा प्रकार घडला असतानाच आता मारुती मंदिर सारख्या भरवस्तीत भागातदेखील
पोलीस असल्याची बतावणी करत एका वृध्देचे सत्तर हजार रूपयाचे दागिने लांबविण्याचे प्रकार घडला आहे त्यामुळे बनावट पोलीस चोरट्यांना पकडणे हे रत्नागिरी पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे
रत्नागिरी शहरातील पारस दर्शन के सी जैन नगरमध्ये राहणाऱ्या फिर्यादी जागृती जयराम तावडे याचा ७ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला त्यांच्या घरातील मिक्सर दुरूस्त करण्यासाठी मारुती मंदिर येथील साजिद किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक दुकानात गेल्या होत्या या मिक्सर देऊन घरी परतत असताना मारुती मंदिर एकता मार्गावर सफेद कपडे घातलेला एक इसम आला त्याने समोरच्या इसमाकडे बोट दाखवून ते पोलीस आहेत व तुम्हाला साहेबांनी बोलावले आहे असे सांगितले त्यावेळी आणखी एक इसम त्याठिकाणी आला व त्यांनी फिर्यादीची त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व गळ्यातील सोन्याची चेन काढून देण्यास सांगितले आपण तुमचे दागिने पुडीत बांधून देते असे सांगून दुसर्या खोट्या दागिन्याची पुडी त्यांच्या हातात ठेवली फिर्यादी यांचे खरे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला
www.konkantoday.com