
कोकण चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत बत्ती गुल,महावितरण व नगरपरिषदेचा ढिसाळ कारभार उघड
रत्नागिरी शहरात प्रथमच कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुरत्न कलावंत मंच हे आयोजक आहेत आणि विशेष बाब म्हणजे रत्नागिरी नगर परिषद ही सुध्दा आयोजक आहेत.असे असताना ही स्वा.वीर सावरकर नाट्यगृहात काल झालेल्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रम सुरू असताना बत्तीगुल झाली.नाट्यग्रुहात जनरेटर ची सोय असताना ही जनरेटर सुरू नसल्याने सुमारे अर्धातास कार्यक्रम काळोखात सुरू ठेवावा लागला.
प्रेक्षकांनी आपल्या मोबाईलने स्टेजवर लाईट दिली आणि बिचा-या कलावंतांना अशा मिणमिणत्या उजेडावर आपली कला सादर करावी लागली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदुराणी जाखड आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते.कोकणातील कलावंतांना त्यांचे व्यासपीठ मिळावे, रत्नागिरी चे सौंदर्य जगभर प्रसिद्ध करावे अशा शुद्ध हेतूने मुंबई च्या दिग्गज कलाकारांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.निवडक 10 चित्रपट रोज मोफत दाखविण्यात येणार आहेत.
मात्र उद्घाटनप्रसंगी रत्नागिरी नगर परिषदेच्या अशा ढिसाळ कारभारामुळे उपस्थित प्रेक्षकांनी निषेध व संताप व्यक्त केला.
www.konkantoday.com