कुर्ली फाटा येथे पैशाच्या वादातून मारहाण, मंगळसूत्रही हिसकावले

रत्नागिरी : तालुक्यातील कुर्ली फाटा येथे पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. तसेच त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकारही घडला आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. विजय जाधव असे मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची तक्रार त्याची पत्नी सानिका जाधव हिने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय जाधव व संशयित आरोपी नंदकुमार जाधव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पैशावरून वाद सुरू होता. दरम्यान ९ मे रोजी सकाळच्या सुमारास सानिका व तिचा पती कुर्ली फाटा येथे आले होते. यावेळी ॲक्टिवा गाडीवरून आलेल्या नीलेश याने विजय जाधव यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच तुम्ही जर माझे पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. यावेळी पतीला मारहाण होत असल्याचे पाहून पत्नी सानिका या वाचवण्यासाठी पुढे आल्या असता आरोपीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. अशी तक्रार सानिका जाधव यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे . सानिका यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी निलेश नंदकुमार जाधव (रा.आडीवरे, ता . राजापूर) याच्याविरूद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button