
रत्नागिरी पोलिस ठाण्यातील बेवारस वाहनांचा 13 रोजी लिलाव
रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा 13 मे रोजी सकाळी 11 वाजता लिलाव होणार आहे. इच्छुकांनी व भंगार विक्रेते यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी केले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत शोध घेऊनही वाहनाचे मालक न सापडल्याने 6 गाड्यांचा लिलाव पुकाराला आहे. त्यामध्ये सुझुकी एक्सेस, हिरोहोंडाची स्प्लेंडर मोटार सायकल, बजाजची स्कुटर, हिरोहोंडा कंपनीची एम एस 100 मोटारसायकल, हिरोहोंडा कंपनीची मोटारसायकल आणि यामाहा कंपनीची आर एक्स 100 मोटारसायकल यांचा समावेश आहे. या वाहनांचा लिलाव सोमवार 13 मे रोजी सकाळी 11 वाजता शहर पोलीस ठाण्यात होणार आहे. इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.