
राजापुरातील ग्रामीण रूग्णालयात सर्पदंशामुळे दाखल झालेल्या रुग्णांसाठी डॉ. राम मेस्त्री ठरले देवदूत!
राजापूर ग्रामीण रुग्णालयात सोमवारी रात्री सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांच्यामुळे जीवदान मिळाले. डॉ. मेस्त्री कोल्हापूर येथील कार्यशाळा आटोपून परतत असताना अर्ध्या रस्त्यात त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाबद्दल माहिती मिळताच त्यांनी तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात येत उपचार केले व मरणाच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णाला जीवदान दिले.
डॉ. राम मेस्त्री सोमवारी कोल्हापूर येथील विभागीय स्तरावरील कार्यशाळेसाठी गेले होते. यावेळी राजापूर ग्रामीण रुग्णालमौत प्रशिक्षित डॉक्टर कार्यरत होते. सायंकाळी कार्यशाळा आटोपून डॉ. मेस्त्री राजापूरला येत असताना राजापूर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना संपर्क साधत एक सर्पदंश झालेली महिला दाखल झाल्याचे सांगितले. डॉ. मेस्त्री यांनी या रुग्णाची सर्व माहिती घेत रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांना उपचार कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले.
दरम्यान डॉ. मेस्त्री हे अणुस्कुरा घाट उतरत असताना त्यांना रुग्णालयात आणखी एक दारूच्या अंमलाखाली असलेला सर्पदंश झालेला रुग्ण दाखल झाल्याची माहिती देण्यात आली. डॉ. मेस्त्री दरम्यान फोनवरुन माहिती देत उपचारांबद्दल मार्गदर्शन करत राहिले. रात्री सव्वा दहाच्या दरम्यान रुग्णालयात पोहचूण रुग्णांवर उपचार केले. रुग्णासाठी डॉ. मेस्त्री हे देवदूताप्रमाणे धावून आल्यान नातेवाईकांनी डॉ. मेस्त्री यांचे आभार मानले.www.konkantoday.com




