घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना जाब विचारल्याच्या रागातून शिरगाव येथे वृद्धाला मारहाण; पाचजणांवर गुन्हा दाखल

चिपळूण : आपल्या घरासमोर लघुशंका का करता? येथे लोकवस्ती आहे, असे विचारल्याच्या रागातून 5 जणांनी वृद्धाला मारहाण केली आहे. तालुक्यातील शिरगाव ब्राह्मणवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत शिरगाव पोलिसांनी अज्ञात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद कौस्तुभ प्रकाश जोशी (रा. शिरगाव ब्राह्मणवाडी) यांनी शिरगाव पोलिसांत दिली आहे. ही घटना दि. 4 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. कौस्तुभ जोशी यांच्या घराच्या दिशेने तोंड करून काहीजण लघुशंका करीत होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी, येथे लोकवस्ती आहे. पुढे जा असे सांगितले. याबाबत आपण पोलिसांना फोन करू, असे सांगताच त्या अनोळखी व्यक्‍तींनी त्यांना मारहाण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button