गुहागर बाजारपेठेमधील 28 अतिक्रमणे हटविणार

गुहागर : शहर बाजारपेठेतील 28 खोकेधारकांना शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा गुहागर महसूल विभागाने पाठविल्या आहेत. शासकीय जागा खाली करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महसूल विभागाने दोन वर्षाने या नोटीस पाठविल्या असल्याने खोकेधारकांना पुन्हा एकदा शासकीय कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे.
गुहागर शहरातील शहर नाका, श्री व्याडेश्वर मंदिरामागील जागा, गुहागर एस. टी. डेपो व गुहागर ग्रामीण रूग्णालयासमोर असे मिळून 28 खोकेधारक आहेत. या खोकेधारकांकडून दस्त वसुली केली जाते. मात्र, सदर खोके शासकीय जागेत असल्याने विनापरवाना बांधकाम म्हणून गुहागर महसूल विभागाने खोकेधारकांना अतिक्रमण केल्याची नोटीस दिली आहे. अतिक्रमण आठ दिवसांच्या आत हटविण्यात यावीत अन्यथा अतिक्रमण हटविण्यासाठी होणार्‍या खर्चासहीत वसुली करण्यात येईल असे म्हटले आहे. शहरात मुळात कमी विस्ताराची बाजारपेठ आहे. अशामध्ये छोटे व्यावसायिक खोके उभारून आपला व्यवसाय करीत आहेत. गुहागर झीरो नाक्यापासून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होणार असल्याने यातील बहुतांशी खोके या रुंदीकरणामध्ये उठणार आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button