गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या बेळगावमधील दोघांना वाचवले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे बुडणार्‍या दोघांना येथील जीवरक्षकांनी वाचवले. ही घटना गुरुवार 5 मे रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास
घडली. दाऊद टिपू (वय 21), मकारुप (वय 29, दोन्ही रा. बेळगाव) अशी वाचवण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने पर्यटकांची गणपतीपुळे येथे गर्दी होत आहे. गुरुवारी बेळगाव येथील चारजण गणपतीपुळेला पर्यटनासाठी आले होते. सकाळी ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना त्यातील दोघे खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून समुद्रकिनार्‍यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांनी आणि जीवरक्षकांनी समुद्रात उड्या मारून त्यांना पाण्याबाहेर काढले. यासाठी जीवरक्षक अक्षय माने, अनिकेत चव्हाण, विक्रम राजवाडकर, आशिष मोने यांनी कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button