असुर्डे येथे पुलावरून कार नदीत कोसळून एक ठार, दोन जखमी

चिपळूण : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर असुर्डे पुलावरून इको कार (एम एच 01 बीएफ 5291) नदीत कोसळून एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातातील इको कारवरील चालक आपल्या ताब्यातील कारने जात असताना कार असुर्डेत पुलावरून खाली पडून अपघात झाला. यामध्ये अरुण लक्ष्मण घोगले (वय 67, रा. मुंबई) हे जागीच मृत झाले असून गाडीतील चंद्रशेखर गोपाळ कदम (वय 70) व रतन रमेश कहार (वय 20) हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button