
महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर
दोन वर्षाचे कोरोनाचे कालखंडानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महोदय मा.श्री.काकासाहेब कोयटे हे कोकणच्या दौऱ्यावर दि.५ मे २०२२ रोजी येत आहेत. यावेळी ते रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्था अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. या प्रसंगी क्रास प्रणाली, एनपीए वर्गवारी, पतसंस्थाची भविष्यातील स्पर्धात्मक वाटचाल, ठेव संरक्षण, परिपत्रक उपलब्ध होण्यास लागणारा विलंब तसेच पतसंस्थांच्या विविध प्रकारच्या समस्या अशा विषयांवर त्यांचे मार्गदर्शन दि.०५/०५/२०२२ रोजी दु.११.३० वा.रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय, जवाहर पथ, जयस्तंभ, रत्नागिरी येथे उपलब्ध होणार आहे.
तरी जास्तीत जास्त पतसंस्थांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.