
पुढील तीन महिन्यामध्ये रिफायनरीबाबतचा सकारात्मक निर्णय?
कोकणातील रिफायनरीबाबत आता वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आता केंद्र आणि राज्य स्तरावर वेगाने घडामोडी, चर्चा सुरु आहेत.
कॉस्ट असेसमेंट अर्थात प्रकल्पासाठी लागणाऱ्या साऱ्या बाबी, त्यासाठी येणारा खर्च याबाबतचा आराखडा तयार करण्याचं काम वेगाने सुरु आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यामध्ये रिफायनरीबाबतचा सकारात्मक निर्णय होणार असल्याचे कळत आहे
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगावच्या पंचक्रोशीमध्ये तब्बल 13 हजार एकर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. शिवाय, नाटे या ठिकाणी क्रूड ऑईल टर्मिनलच्या उभारणीसाठी देखील 2400 एकर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये याबाबतचा उल्लेख केला आहे. त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर देखील याबाबींना वेग आला आहे
रिफायनरी येणाऱ्या भागात परप्रांतियांनी हजारो एकर जमीन खरेदी केल्याचे पुढे आलेआहे जानेवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत झालेली जमीन खरेदीमध्ये जम्मू-कश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल, कर्नाटकसह राज्यातील विविध भागातील लोकांनी जमीन खरेदी केली आहे.
रिफायनरीबाबत समर्थक असतील किंवा विरोधक अद्याप देखील शक्तीप्रदर्शन करत आहे.
www.konkantoday.com