सिंधुदुर्गातील धामापूर तलावात मृत माशांचा खच

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या श्री देवी भगवती मंदिराशेजारील असलेल्या धामापूर तलावात अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लहान मोठे मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे.अचानक मासे मृत होण्यामुळे संपूर्ण तलावाच्या काठावर मेलेले मासे तरंगत येऊन मृत माशांचा खच पडला आहे आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाल्याचे स्थनिकांच्या निदर्शनास आले आहे.धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकार व्यक्तींनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत होण्याचे नेमके कारण अजून निश्चित समजले नाही.
wwwkonkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button