
सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कारांसाठी नामांकना साठी सहभागी होण्याचे आवाहन
युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनतर्फे (UNWTO) सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्यात आली आहेत. राज्यातील अधिकाधिक गावांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या विभागीय स्तरावर सहा उपसंचालकांना तसेच जिल्हा परिषदांच्या ३३ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.या पुरस्कारांसाठी नामांकने भरण्यासाठीची अंतिम मुदत १५ मे अशी आहे. याअनुषंगाने prakash.om50@nic.in आणि gargi.mittal@gov.in या ईमेल आयडीवर नामांकने भरण्याचीही सूचना केली आहे. कमी लोकसंख्या असलेल्या अर्थात जास्तीत जास्त १५ हजार लोकसंख्या असलेल्या, पारंपरिक उपक्रम- शेती, जंगल, पशुपालन किंवा मासेमारी आणि सांस्कृतिक व सामाजिक देवाणघेवाण असलेली गावे या पुरस्कारासाठी नामांकन भरण्यास पात्र ठरणार आहेत. त्याचवेळी सर्वोत्तम पर्यटन गावे, अपग्रेड प्रोग्राम आणि सर्वोत्तम पर्यटन या श्रेणीसाठी गावांना नामांकने सादर करता येणार आहेत.
प्रत्येक गावात ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता मदत करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. या मानाच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी अर्ज करावे यासाठी आमचा हा प्रयत्न आह़े नामांकने भरण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी http://www.unwto.org/tourism-villages या वेबसाईटला भेट देता येईल, असे पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com