मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला काही अटी शर्थी लावण्यात आल्या होत्या. तब्बल 16 अटी लावण्यात आल्या होत्या. यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देखील राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा झाल्याची माहिती आहे.
www.konkantoday.com