नांदिवडेतील खून प्रकरणी संशयिताची रवानगी न्यायालयीन कोठडीत
रत्नागिरी : तालुक्यातील नांदिवडे येथे प्रेमप्रकरणातून चैताली पांचाळचा खून करणार्या संशयिताला न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.
समीर प्रकाश पवार (वय 22,सध्या रा.नांदिवडे अंबुवाडी, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. समीरने चैतालीचा खून करून ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जयगड पोलिसांनी तपास करत समीरला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. रविवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने समीरला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.