आता अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंची नक्कल करत पलटवार केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांच्यावर पलटवार केला आहे. विविध राजकीय नेत्यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडविणाऱ्या राज ठाकरेंचीच नक्कल करत आता अजित पवारांनी निशाणा साधला आहे.
राज ठाकरे कधी दुपारी भर उन्हात सभा घेत नाहीत. सूर्य मावळला, संध्याकाळ झाल्यानंतर वातावरण चांगले झाले की मग हे सभा घेतात. मग ते नॅपकिनने तोंड पुसत असतात. ( यावेळी अजित पवार यांनी नॅपकीन मागवला आणि राज ठाकरे यांची तोंड पुसण्याची नक्कल केली) ते काय पुसत असतात काय माहीत. काय एकदाचं आहे ते पुसून घे आणि मग बोल ना. सारखं सारखं काय नाकाला नॅपकिन लावायाचा, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.
www.konkantoday.com