जिल्हास्तरीय विज्ञान रंजन स्पर्धेत गौरी शिंदे, सेजल घाणेकर प्रथम

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या विज्ञान रंजन स्पर्धा २०२२ मध्ये प्राथमिक गटातून ज.ग.पेडणेकर विद्यालय तळवडे ( ता.लांजा) ची विद्यार्थीनी गौरी प्रमोद शिंदे हिने तर माध्यमिक गटात वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणेची विद्यार्थीनी सेजल सुरेश घाणेकर हिने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला.

विज्ञान रंजन स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल पुढीलप्रमाणे

प्राथमिक गट – द्वितीय- सुफिया शमसुलाह खान( राजापूर) ,तृतीय- स्वरा मिलिंद विखारे ( चिपळूण), चतुर्थ – दुर्वाक अनिलकुमार गायकर ( संगमेश्वर),पाचवा- फरहिन अजनम अली अन्सारी ( रत्नागिरी),उत्तेजनार्थ- श्रुती आग्रे ( रत्नागिरी) , सार्थक पाटील ( दापोली) .
माध्यमिक गटातून द्वितीय- अनम असिफ नाईक ( रत्नागिरी) , तृतीय- श्रद्धा धर्मपाल जाधव ( देवरुख), चतुर्थ- ऐश्वर्या रवींद्र जाधव ( दापोली), पाचवा- सुबोध रमेश यादव ( अलोरे) ,उत्तेजनार्थ- रेश्मा प्रकाश नामये ( लांजा), शामसिया सलीम कोतवडेकर (राजापूर) यांनी जिल्हास्तरावर यश प्राप्त केले.

विज्ञान रंजन स्पर्धेचातालुका स्तरावरील निकाल

प्राथमिक गट – दापोली तालुका – प्रथम-सार्थक पाटील,द्वितीय- निनाद पेवेकर, तृतीय- मनस्वी सागर ,गुहागर तालुका– प्रथम- आर्या गोयथळे,द्वितीय- किमया नेटके, तृतीय – समर्थ मोरे, चिपळूण तालुका प्रथम- स्वरा विखारे , द्वितीय- आर्या बांदे, तृतीय- श्रेया काजवे, संगमेश्वर तालुका – प्रथम – दुर्वाक गायकर,द्वितीय- श्रीया भालेकर, तृतीय – अफशा अंबेडकर, रत्नागिरी तालुका – प्रथम – अन्सारी फरहिन अजमतअली , द्वितीय- श्रुती आग्रे ,तृतीय- गौरी भुवड , लांजा तालुका– प्रथम – गौरी शिंदे ,द्वितीय- यश पाटोळे, तृतीय – आयुष इंगळे,
राजापूर तालुका – प्रथम- सुफिया खान,द्वितीय – ग्रिष्मा दळवी, तृतीय- मारिया अबिद शेख.

माध्यमिक गट
दापोली तालुका – प्रथम – ऐश्वर्या जाधव, द्वितीय- अनुष्का गोरे, तृतीय- वरद नाटेकर, गुहागर तालुका – प्रथम- सेजल घाणेकर ,द्वितीय- तनुष जामसूतकर, तृतीय- अश्विनी कदम.
चिपळूण तालुका– प्रथम सुबोध यादव,द्वितीय- साक्षी कासार ,तृतीय- कुलदीप कांबळे ,संगमेश्वर तालुका – प्रथम – श्रद्धा जाधव,द्वितीय- सुकन्या साळुंखे ,साक्षी बेंद्रे,तृतीय- सिमरन कांबळे,नवीद रिजवान, रत्नागिरी तालुका– प्रथम- अनम असिफ नाईक, द्वितीय- वैष्णवी शेटये, तृतीय- सार्थक रावणंग, लांजा तालुका– प्रथम- रेश्मा नामये,द्वितीय- फानिमा समीर नागले, तृतीय- तन्वी गुरव, राजापूर तालुका– प्रथम – शामसिया कोतवडेकर, द्वितीय – प्रियदा नितीन राजे, तृतीय- हेमाली रवींद्र गुरव यांनी यश मिळविले.

सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्याचे रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.बक्षीस वितरण समारंभ शाळा सुरु झाल्यावर जून महिन्यात घेण्यात येणार आहे.तारीख लवकरच कळविण्यात येईल असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.स्पर्धा आयोजनात इम्तियाज सिद्धिकी, राजेंद्र कुंभार, सौ.विणा कुलकर्णी ,अन्य पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button