जयगड-निवळी मार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात
रत्नागिरी : जिल्ह्यातील जयगड-निवळी मार्गावर निवळी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे.
ट्रक आणि कारमध्ये झालेल्या या अपघातामध्ये कारचालक जखमी झाला आहे. अपघातानंतर जखमीला बाहेर काढण्यात आले. येथील स्थानिकांनी या ठिकाणी धाव घेत मदतकार्य केले. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.