तीन दिवसांनी शनिवारी सापडला सुजयचा मृतदेह
चिपळूण : तीन दिवसांपूर्वी कोळकेवाडी धरणात सायंकाळी पाचच्या सुमारास चारजण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघांना ग्रामस्थांनी वाचविले तर अन्य दोघेजण बेपत्ता होते. त्यातील ऐश्वर्या खांडेकर या तरुणीचा मृतदेह दुसर्या दिवशी सापडला तर यातील बेपत्ता सुजय गावठे याचा मृतदेह तीन दिवसांनी शनिवारी सापडला आहे. महाड येथील रेस्क्यू टीमने ऐश्वर्याचा मृतदेह शोधून काढला. मात्र, सुजय गावठे याचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी अलोरे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुजयचे वय 31 होते. तो इंजिनिअर होता. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.