अत्याचारी, फरार मुख्याध्यापकाच्या मुलाला पुण्यातून अटक; लांजा पोलिसांकडून कसून चौकशी

लांजा : गवाणे येथील सहावीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक नथू सोनवणे याचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या पथकाने पुणे येथे जाऊन त्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी २९ एप्रिल रोजी त्याला घेऊन लांजा पोलिसांचे पथक सायंकाळी लांजा येथे दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. नथू सोनवणे याच्यावर रविवारी २४ एप्रिल रोजी लांजा पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गेल्या रविवारपासून तो बेपत्ता असल्याने पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते.

लांजा पोलिसांच्या पथकाने पुणे येथे जाऊन सोनावणे याच्या मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर पुण्याहून हे पथक शुक्रवारी सायंकाळी लांजा येथे दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडून नथू सोनवणे याच्याबाबत चौकशी सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button