
रत्नागिरीत राजीवडा नाका येथे फळविक्रेत्याला मारहाण
रत्नागिरी : आपला लाकडी टेबल दोघांना न विचारता फळ विक्रीसाठी घेतले, याचा राग ठेवत शहरातील राजीवडा येथे फळ विक्रेत्याला मारहाण करण्यात आली. ही घटना 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता राजीवडा मच्छिमार्केट समोर घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान गफार पकाली (वय 30, रा. राजीवडा, मच्छीमार्केट) याने पोलिसांकडे तक्रार दिली. मौसिन फणसोपकर व कैस फणसोपकर (दोन्ही राहणार राजीवडा नाका, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सलमान याने फळविक्रीसाठी मौसिन व कैफ फणसोपकर यांचे टेबल न विचारता फळ विक्रीसाठी घेतले होते. याचा राग मनात ठेवत मारहाण केली. याचा अधिक तपास सहायक पोलिस करत आहे.