मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठीच्या नवीन पुलावरच्या सळ्यानी पुन्हा डोके वर काढले
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठीच्या नवीन पुलावरची वाहतूक सध्या धोकादायक बनली आहे.या पुलावरील सिमेंट काँक्रिटीकरणातील लोखंडी सळ्या पुन्हा बाहेर पडल्याने अपघाताची शक्यता आहे. वाहनांची कायम वर्दळ असणारा हा मार्ग आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.पुलाच्या मध्यवर्ती भागातही तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषत: दुचाकीची वाहतूक धोकादायक बनली आहे. पुलाच्या मध्यावर ठिकठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. त्या सळ्यांवरुन चार चाकी वाहन गेल्यास त्याचा आवाजही येतो. या लोखंडी सळ्यांमुले अपघाताची घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
www.konkantoday.com