
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा तिठा येथे स्थानिकांचे आंबा स्टॉलवर खरेदीदारांची गर्दी दिसू लागली
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे हापूसची विक्री करणार्या स्थानिक स्टॉलधारकांना यंदाचा हंगाम समाधानकारक जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे विक्रीसाठी स्टॉलधारकांना मनाई केली होती. यंदा पर्यटक वाढल्याने दररोज सरासरी लाखभराची उलाढाल होते.
हापूसच्या हंगामाची सुरूवात झाली असून स्थानिक बागायतदारांसह काही ग्रामस्थ मुंबई-गोवा महामार्गावरील महत्वाच्या थांब्यावर विक्रीसाठी स्टॉल लावतात. यामध्ये हातखंबा येथील अनेक स्टॉलधारकांची गर्दी असते. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या रत्नागिरी शहराकडे याच थांब्यावरून जावे लागते. मुंबईवरून गोव्याकडे जाणारे आणि गोव्याकडून मुंबईकडे जाणारा बहुसंख्य पर्यटक या ठिकाणी नाष्टा, पेट्रोलसाठी थांबतात. त्यामुळे खरेदीसाठीही येथे पर्यटकांची गर्दी होते. काही ग्रामस्थ पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्टॉल लावून बसलेले असतात.
www.konkantoday.com