नैसर्गिक संसाधने जतन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढीकरिता नैसर्गिक संसाधने जतन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पासाठी पुढील ५ वर्षांसाठी १७२ कोटी ३९ लाख रुपयांचा खर्च येईल.
महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पांतर्गत जनुकीय संपत्तीचे जतन करण्याच्या अनुषंगाने सागरी जैवविविधता, पिकांचे स्थानिक वान, पशुधनाच्या स्थानिक जाती, गोडय़ा पाण्यातील जैवविविधता, गवताळ, माळरान आणि कुरणांमधील जैवविविधता, वनहक्क क्षेत्रासाठी संरक्षण व व्यवस्थापन योजना, वन परिसर पुनर्निर्माण हे सात महत्त्वाचे घटक निश्चित करण्यात आले आहेत. वरील सात घटकांना पूरक असे माहिती व्यवस्थापनाकरिता भक्कम व्यासपीठ निर्माण करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com