
विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापक फरार,मुख्याध्यापकाची कार रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पार्क केलेल्या अवस्थेत
आपल्याच शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकाची कार रत्नागिरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी पार्क केलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आली आहे.दरम्यान त्याच्या सर्व कुटुंबीयांचे मोबाईल देखील स्विचऑफ असल्याने त्याचे मोबाईल लोकेशन शोधण्यासाठी लांजा पोलिसांनी रत्नागिरी सायबर क्राईम विभागाची मदत घेतली आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरी फरार मुख्याध्यापकाला अटक होत नसल्याने गवाणे ग्रामस्थ आक्रमक झाले असून याबाबत आज गुरुवारी २८ रोजी सर्व ग्रामस्थ पुन्हा एकदा लांजा पोलिसांची भेट घेणार आहेत. इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्याध्यापकावर लांजा पोलिस ठाण्यात २४ एप्रिल रोजी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र शनिवारी २३ एप्रिल पासूनच तो बेपत्ता असल्याने आणि त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ असल्याने त्याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे .गेल्या-तीन दिवसांपासून लांजा पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
www.konkantoday.com