कोकण रेल्वे मार्गावर धावणारी डबलडेकर एक्स्प्रेस आता १२ ऐवजी १६ डब्यांची धावणार
कोकण रेल्वे मार्गावरून दिवसा तसेच रात्री अशा दोन्ही वेळेत धावणार्या डबलडेकर एक्स्प्रेसचे डबे जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत वाढवण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकण रेल्वेमार्गावर विविध स्थानकांवर उतरणार्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून रेल्वेने या वातानुकुलीत दुमजली गाड्यांना चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी डबलडेकर एक्स्प्रेस आता १२ ऐवजी १६ डब्यांची धावणार आहे.
उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणार्या सर्वच गाड्यांना गर्दी वाढताना दिसत आहे. कोरोनाची बंधने शिथिल झाल्यामुळे रेल्वेगाड्यांना पूर्वीप्रमाणेच गर्दी होताना दिसत आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे कोकण रेल्वेमार्गावरून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगावदरम्यान धावणारी वातानुकुलीत डबलडेकर एक्स्प्रेसच्या गाड्यांना डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगांव द्विसाप्ताहिक डबलडेकरला २८ एप्रिलपासून २ जूनपर्यंत तर मडगांव ते लोकमान्य टिळक टर्मिनस धावणार्या अप डबलडेकर एक्स्प्रेसला २९ एप्रिलपासून ३ जूनपर्यंत या कालावधीसाठी थ्री टायर एसी श्रेणीचे चार अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत. याच मार्गावर डबलडेकर एक्स्प्रेसला ३० एप्रिलपासून ४ जूनपर्यंत तर मडगांव लो. टिळक टर्मिनसदरम्यान धावणार्या साप्ताहिक डबलडेकर एक्स्प्रेसला १ मे ते ५ जून २०२२ या कालावधीसाठी अतिरिक्त थ्री टायर एसी श्रेणीचे चार कोच जोडले जाणार आहेत. www.konkantoday.com