आकाशवाणीच्या एआयआरनेक्स्ट वक्तृत्व स्पर्धेत लांजाचे सिमरन, अमित विजयी

रत्नागिरी | प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रसारभारतीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे #एआयआरनेक्स्ट अंतर्गत आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, लांजा येथे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी ‘स्वातंत्र्य चळवळ आणि पत्रकारिता’, ‘एका स्वातंत्र्य सैनिकाचे मनोगत’ आणि ‘आजची प्रसारमाध्यमे – वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. त्याला चांगला प्रतिसाद महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिला. आपली मते विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे मांडली. यामध्ये प्रथम क्रमांक सिमरन शेख हिचा तर द्वितीय क्रमांक – अमित पवार याचा आला. या स्पर्धेसाठी राजेश गोसावी आणि प्रजाप माने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त प्रसारभारतीच्या आकाशवाणीच्या वतीने संपूर्ण देशभर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून युवकांची मते त्या निमित्ताने मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. लांजा महाविद्यालयातील विजेत्यांच्या सहभागावर आधारित विशेष #AIRNxt कार्यक्रम रविवार, दिनांक, ८ मे रोजी , संध्याकाळी ७.३० वाजता, महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरुन प्रसारीत होणार आहे.

यावेळी उदघाटन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर, कार्यक्रम अधिकारी समन्वय नंदादीपक बट्टा, प्रा. डॉ. राहुल मराठे, प्रा. डॉ. महेश बावधनकर, उपप्राचार्य काशिनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले तर स्पर्धा विषयक माहिती संजना कानागल यांनी दिली. आभारप्रदर्शन नंदादीपक बट्टा यांनी तर सूत्रसंचालन संजना कानागल यांनी केले. तर मनोज जॉर्ज, संजय चव्हाण आणि विकास बडकस यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button