
जगातील पाहिलं ओले काजूगर सोलायचं मशीन
मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या हस्ते अनावरण.
लांजा तालुक्यातील कोट गावातील श्री उदय खेर ह्यांनी जगातील पहिल ओले काजूगर सोलायचं मशीन तयार केलं आहे.
काजू निगडित गेले ३ वर्ष मा.आमदार शेखर निकम सर व काजू उत्पादक शेतकरी प्रतिनिधी म्हणून मी काम करत असताना अनेक विषय मार्गी लावायचा प्रयत्न केला आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या पुढाकाराने परदेशी दर्जाच्या काजू बोंड मद्यनिर्मिती ची मंजुरी दिली आहे.
ओले काजू सोलायच्या मशीनची शेतकऱ्यांची मागणी गेल्या १५ वर्षांपासूनची आहे. अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत, कोकण कृषी विद्यापीठाने देखील हा प्रयत्न दोनदा केला होता पण ह्यावेळी एका शेतकऱ्याने तयार केलेल्या मशीनने क्रांती घडवली आहे आणि हे जगातील पाहिलं मशीन असून ह्याचा सक्सेस रेट १००% इतका आहे.
खेर ह्यांनी ह्या मशीन साठी गेले ३ वर्ष मेहनत घेतली असून अनेक प्रकारच्या आणि आकाराच्या काजू बी वर ट्रायल घेऊन हे मशीन तयार केले आहे.खेर यांची स्वतःची काजू बाग असून त्यांनी ह्या मशीनचा वापर स्वतःसाठी सुरू केला आहे.
मुळात खेर हे मोटर वाईंडिंग मशीन चे एक्सपर्ट आहेत आणि त्यांनी त्यांचा गेल्या ३० वर्षाचा अनुभव ह्यात पणाला लावून ह्या मशीनची निर्मिती त्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खरवते येथे आमदार मा. शेखर निकम सर ह्यांच्या मतदार संघात विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी आले असता फणसकिंग हरिश्चंद्र देसाई व मी खेर ह्यांची भेट आमदार शेखर निकम सरांच्या मार्फत अजितदादा पवार यांच्याशी करून दिली. आम्ही या मशीनच्या निर्मितीबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांना पूर्ण माहिती दिली व खेर ह्यांनी त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्या मशीनचे अनावरण केले.
खेर ह्यांनी पेटंट फाईल केलं असून लवकरात लवकर पेटंट मंजूर होऊन हे मशीन शेतकऱ्यांचा घरोघरी वापरलं जाईल हा प्रयत्न आमदार शेखर निकम सर व माझा राहील जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. भविष्यात या मशिनला सरकारमार्फत सबसिडीची तरतूद करता येईल असा प्रयत्न आम्ही करू.
कोकणातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमदार शेखर निकम ह्यांनी आजपर्यंत अथक परिश्रम घेतले आहेत.
मशीन च्या अनावरण करतेवेळी खासदार सुनीलजी तटकरे, मंत्री उदय सामंत, आमदार भास्कर जाधव उपस्थित होते.
www.konkantoday.com