मुंबई विद्यापीठ आविष्कार स्पर्धेत रत्नागिरी उपपरिसराचे घवघवीत यश

0
168

तब्बल 4 प्रकल्प आविष्कारच्या अंतिम फेरीत

रत्नागिरी- विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती आणि नवनिर्माण क्षमता विकसीत करण्यासाठी मुंबई विद्यापीठ प्रतिवर्षी आविष्कार या स्पर्धेचं आयोजन केलं जातं… याच स्पर्धेत चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसराने पद्वव्युत्तर विभागात 12 प्रकल्पांमध्ये सहभाग नोंदवत त्यातील 4 प्रकल्पांची निवड अंतिम फेरीसाठी झालीय…. यामध्ये पद्धव्युत्तर शुद्ध विज्ञान प्रकारात 2 प्रकल्प अंतिम फेरीसाठी पात्र झालेत या प्रकल्पात गंधर्व सागवेकर, सोनल जाधव आणि वैष्णवी नागवेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तर मानवता भाष आणि ललित कला प्रकारात एका प्रकल्पाची अंतिम फेरीसाठी निवड झालीय यात सृष्टी तावडे या विद्यार्थिंनीने सहभाग नोंदवला आणि कृषी आणि पशुसंवर्धन प्रकारात ओंकार कदम, सिद्धी मांडवकर यांची आविष्कारच्या अंतिम फेरीसाठी निवड झालीय…
या सर्व प्रकल्पांची यशस्वी निवड होण्यासाठी रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर, सहाय्यक कुलसचिव श्री अभिनंदन बोरगावे यांचे मार्गदर्शन लाभले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आविष्कर कमिटीमधील डॉ पांडूरंग पाटील, श्रीमती तौफिन पठाण आणि डॉ सतिश मांजरे यांनी प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here