
चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला?, अशा शब्दात रॅपीड टेस्टवरून शिवसेनेचा निशाणा
काँग्रेस आणि समाजवादी पार्टीबरोबरच शिवसेनेनेही आता रॅपीड टेस्ट कीटवरून भाजपसमोर सवाल उपस्थित केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून रॅपीड टेस्ट कीटवरून मोदी सरकारवर शिवसेनेने टीका केली आहे.
मोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला दिली, त्या किट्सची पहिली खेप बिनकामाची निघाली. शेवटी चिनी माल भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या की, `झाले ते झाले. सध्याच्या बोगस कीट्सऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्स वापरा!’ म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला?, अशा शब्दात रॅपीड टेस्टवरून शिवसेनेने निशाणा साधला आहे.
www.konkantoday.com